विशेष बातम्या
प्रांत ग्राहक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ. विकास बिसुरे!
By nisha patil - 10/11/2025 5:01:14 PM
Share This News:
प्रांत ग्राहक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ. विकास बिसुरे!
राज्यभर नवीन कार्यकारणी स्थापन करण्याचे सर्वाधिकार : राजेश भोसले
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि सामान्य जनतेसाठी सातत्याने कार्य केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडी भाजपचे उपाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास बिसुरे यांची प्रांत ग्राहक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीची घोषणा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी केली असून, महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी स्थापन करण्याचे सर्वाधिकारही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
गेल्या ३० वर्षांपासून प्रांत ग्राहक संघटनेचे कार्य संपूर्ण भारतभर सुरू आहे. ग्राहक चळवळीत डॉ. बिसुरे यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून, “सामान्य ग्राहकाला न्याय मिळवून देणे” हे त्यांचे प्रमुख ध्येय असल्याचे भोसले यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले या गावी एका सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेले डॉ. बिसुरे यांनी संघर्षातून आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी जिल्हा क्षेत्र अधिकारी, दिव्यांग आघाडी आणि जिल्हा उद्योग आघाडीच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत.
कोरोना काळात त्यांनी प्लाझ्मा उपलब्ध करून देणे, मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या रुग्णांना मदत करणे, तसेच बेरोजगार युवकांना कर्जप्रकरणांद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अशी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.
त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन प्रांत ग्राहक संघटनेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. डॉ. बिसुरे यांच्या नियुक्तीने संघटनेच्या कार्यात नवी ऊर्जा निर्माण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रांत ग्राहक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ. विकास बिसुरे!
|