बातम्या
जिल्हा परिषद कोल्हापूरचा डॉ. विष्णू निर्मळे यांना शाहू पुरस्काराने सन्मानित
By Administrator - 6/27/2025 4:17:08 PM
Share This News:
जिल्हा परिषद कोल्हापूरचा डॉ. विष्णू निर्मळे यांना शाहू पुरस्काराने सन्मानित
टाकळीवाडी प्रतिनिधी टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सुपुत्र सैनिक टाकळी येथील पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉक्टर विष्णू शिवाजी निर्मळे यांना 2025 या वर्षीचा छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या कर्तुत्वाने व प्रामाणिकपणाने आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे याची दखल घेऊन पुरस्कार मा.खासदार श्रीमंत शाहूमहाराज, कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पत्नी सौ गीता विष्णू निर्मळे, कु. हर्षदा निर्मळे, श्रीतेज निर्मळे, मारुती निर्मळे, केदार निर्मळे,उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.
जिल्हा परिषद कोल्हापूरचा डॉ. विष्णू निर्मळे यांना शाहू पुरस्काराने सन्मानित
|