बातम्या
टिकेवाडी येथे डॉ. युवराज येडूरे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
By Administrator - 1/30/2026 2:54:19 PM
Share This News:
टिकेवाडी येथे डॉ. युवराज येडूरे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
सत्ता नसतानाही 9.84 कोटींची विकासकामे..
पदासाठी नव्हे, विकासासाठी राजकारण – डॉ. युवराज येडूरे
भुदरगड तालुक्यातील टिकेवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांच्या प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा व्यक्त केला. गेली १६ वर्षे स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या डॉ. येडूरे यांनी सत्ता नसतानाही भुदरगड तालुक्यासाठी सुमारे ९ कोटी ८४ लाख रुपयांचा सीएसआर निधी मंजूर करून विविध विकासकामे केली आहेत.
या निधीतून महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप, रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी विमा योजना, शाळांमध्ये आरो प्लांट, शेतकऱ्यांसाठी आधुनिक फवारणी पंप, तसेच गावोगावी ओपन जिम असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. प्रचारसभेत बोलताना “मी पदासाठी नाही तर गावाच्या विकासासाठी राजकारणात आलो असून, आतापर्यंत केलेल्या कामांपेक्षा अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार आहे,” असे डॉ. युवराज येडूरे यांनी सांगितले.
टिकेवाडी येथे डॉ. युवराज येडूरे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
|