बातम्या

*खोखो स्पर्धेत डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल आजराची गरुड झेप

Dr Zakir Hussain Urdu High School


By nisha patil - 9/29/2026 3:26:17 PM
Share This News:



*खोखो स्पर्धेत डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल आजराची गरुड झेप
 

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा क्रीडा  संकुल,गांधी नगर येथे नुकताच झालेल्या तालुकास्तरीय शासकीय खो खो स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळांच्या 10 संघांनी भाग घेतला होता.या स्पर्धेत उर्दू हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावत यशाला गवसणी घातली.
     

तालुकास्तरीय खोखो स्पर्धेत अंजुमन इतेहादूल इस्लाम,आजरा संचालित,डॉ झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा मुलींच्या संघाने  14 वर्षाखालील वयोगटात यशाची परंपरा कायम राखत प्रथम क्रमांक मिळवला.आता या संघाची जिल्हास्तरीय  स्पर्धेत निवड झाली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या खेळाडूंना सलीम शेख आणि शेरखान पठाण यांचे मार्गदर्शन  त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्य लाभले.


*खोखो स्पर्धेत डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल आजराची गरुड झेप
Total Views: 14