बातम्या
शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दगडू माने यांना राज्य सरकारचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार'
By nisha patil - 8/6/2025 7:56:00 AM
Share This News:
शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दगडू माने यांना राज्य सरकारचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार'
शिरोळ, प्रतिनिधी: शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सिनेअभिनेते डॉ. दगडू माने यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार १० जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाईल.
डॉ. माने यांनी गेल्या तीन दशकांपासून सामाजिक चळवळ, पत्रकारिता, नाटक, चित्रपट आणि जनजागृतीत सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान दिला आहे.
शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दगडू माने यांना राज्य सरकारचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार'
|