बातम्या
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. युवराज येडूरे यांना राष्ट्रीय शौर्य सन्मान; राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
By nisha patil - 6/13/2026 9:41:42 PM
Share This News:
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. युवराज येडूरे यांना राष्ट्रीय शौर्य सन्मान; राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
दिल्ली प्रतिनिधी :दिल्ली येथे “World Human Rights Protection Commission” द्वारे आयोजित महाराष्ट्र स्वयंसेवी संस्था शोध-अभ्यास निबंध अहवाल सादरीकरण कार्यक्रमात महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेल्या डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांनी महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, मानवाधिकार, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि जनहिताच्या विविध प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडले.
त्यांच्या सामाजिक कार्याची, संशोधनात्मक योगदानाची आणि मानवाधिकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत “राष्ट्रीय शौर्य सन्मान (Rashtriya Shaurya Samman)” प्रदान करण्यात आला.
याचबरोबर त्यांची “World Human Rights Protection Commission” च्या National President in Maharashtra (राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र) पदावर निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांची Para Legal Volunteer (PLV) म्हणूनही निवड झाली आहे.
डॉ. येडूरे हे महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन चे अध्यक्ष असून सामाजिक न्याय, मानवाधिकार संरक्षण, कायदेविषयक जनजागृती, महिला व बालकांचे हक्क, तसेच समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
या निवडीमुळे आणि सन्मानामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या यशाबद्दल विविध सामाजिक संस्था, मान्यवर, सहकारी आणि शुभेच्छुकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांनी या सन्मानाबद्दल “World Human Rights Protection Commission”, विधी सेवा प्राधिकरण, सर्व पदाधिकारी, सहकारी व शुभचिंतकांचे आभार मानले असून मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय आणि जनसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. युवराज येडूरे यांना राष्ट्रीय शौर्य सन्मान; राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
|