बातम्या
प्रारूप प्रभाग रचना योग्य व स्वागतार्ह – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
By nisha patil - 4/9/2025 5:45:37 PM
Share This News:
प्रारूप प्रभाग रचना योग्य व स्वागतार्ह – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
महापौरपद शिवसेना- महाविकास आघाडीच्याच खात्यात : सुनील मोदी
कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेने काल जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे स्वागत करण्यात आले आहे. या रचनेनुसार २० प्रभागातून एकूण ८१ नगरसेवकांची निवड होणार असून, लोकसंख्येचे संतुलन राखत नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधांचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे, असे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी सांगितले.
महानगरपालिका प्रशासनाने कोणताही राजकीय दबाव न घेता न्याय्य, विवेकपूर्ण आणि पारदर्शक निर्णय घेतल्याचे मोदी म्हणाले. या ठोस निर्णयासाठी महापालिका प्रशासक व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांनी आभार मानले.
आगामी निवडणुकीत कोल्हापूरकर जनतेच्या ठाम समर्थनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडी अधिकाधिक जागा जिंकून महापौरपद मिळवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रारूप प्रभाग रचना योग्य व स्वागतार्ह – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट
|