राजकीय

महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर

Draft ward structure for municipal


By nisha patil - 3/9/2025 11:56:12 AM
Share This News:



महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर..

 

कोल्हापूर :-  कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी सर्वांचे लक्ष लागलेली प्रारूप प्रभाग रचना आज प्रसिद्ध होणार आहे. यात कोणाचा प्रभाग तुटला, कुणाकडे मतदारसंख्या वाढली, हक्काचे मतदार कुठे गेले, कोणाला नवीन संधी मिळणार यासारख्या अनेक प्रश्नांची प्राथमिक उत्तरे मिळणार आहेत.

ही रचना महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पाहता येणार असून, नागरिकांना व इच्छुकांना १५ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी असेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू झालेल्या प्रक्रियेत महापालिकेसाठी ८१ सदस्य, २० प्रभाग ठरले आहेत. त्यापैकी १९ प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असेल. प्रत्येक प्रभागात २४ ते ३७ हजार लोकसंख्या राहणार आहे.

प्रारूपात साधारण रचना कायम राहते, पण हरकती महत्त्वाच्या ठरल्यास काही फेरबदल होऊ शकतात. यानंतर प्रभागांचे आरक्षण सोडत आणि मतदार यादी प्रक्रिया राबवली जाईल. निवडणुकीचा कार्यक्रम डिसेंबर अखेरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.


महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर
Total Views: 67