खेळ
मेस्सीसोबत फुटबॉल खेळण्याचे स्वप्न साकार; कोल्हापूरच्या पाच खेळाडूंच्या भावना अनावर
By nisha patil - 12/17/2025 11:08:50 AM
Share This News:
कोल्हापूर:- कोल्हापूरच्या पाच तरुण फुटबॉलपटूंना जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत प्रत्यक्ष फुटबॉल खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, “मेस्सीसोबत फुटबॉल खेळलो, आमचे स्वप्न पूर्ण झाले,” अशा भावना या खेळाडूंनी व्यक्त केल्या आहेत.
‘प्रोजेक्ट महादेवा’ या विशेष क्रीडा उपक्रमांतर्गत 13 वर्षांखालील निवडक खेळाडूंना मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मेस्सींसोबत खेळण्याची व संवाद साधण्याची संधी मिळाली. मेस्सी यांनी खेळाडूंच्या कौशल्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या ऐतिहासिक अनुभवामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटूंना नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे.
मेस्सीसोबत फुटबॉल खेळण्याचे स्वप्न साकार; कोल्हापूरच्या पाच खेळाडूंच्या भावना अनावर
|