बातम्या

कोल्हापूरच्या चार तालुक्यांना दुष्काळाचा निकष! हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीरमध्ये ग्राउंड सर्व्हेचे आदेश

Drought criteria for four talukas of Kolhapur


By nisha patil - 11/18/2026 3:04:18 PM
Share This News:



कोल्हापूरच्या चार तालुक्यांना दुष्काळाचा निकष! हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीरमध्ये ग्राउंड सर्व्हेचे आदेश

राज्यातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना राज्य सरकारने आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आता ३०८ वर पोहोचली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, कागल आणि करवीर या चार तालुक्यांसह राज्यातील आणखी नऊ तालुक्यांचे ग्राउंड सर्व्हेक्षण करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या दुष्काळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संबंधित तालुक्यांमधील पिकांचे पंचनामे करून दुष्काळाच्या सर्व निकषांनुसार वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाण्याची उपलब्धता, संभाव्य पाणीटंचाई आणि जनावरांसाठी चाऱ्याच्या परिस्थितीचाही आढावा घेतला जाणार आहे. पालक सचिवांनी अधिवेशनापूर्वी सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील या चार तालुक्यांच्या सर्वेक्षणाकडे आणि शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


कोल्हापूरच्या चार तालुक्यांना दुष्काळाचा निकष! हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीरमध्ये ग्राउंड सर्व्हेचे आदेश
Total Views: 9