बातम्या

अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परप्रांतीयाला अटक.

Drug smuggling immigrant arrested


By nisha patil - 6/6/2025 3:41:25 PM
Share This News:



अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परप्रांतीयाला अटक.

अफूसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त 

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या परप्रांतीय इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलीय.त्याच्याजवळून अफूसह एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.धनराज हमीरामा चौधरी  असं आरोपीचे नाव असून तो सध्या रा.मनेरमाळ इथ राहत होता. आणि मूळच्या गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यातील बगुमारा पलसाना हे त्याच गाव आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर तावडे हॉटेल जवळ ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने  केली.


अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या परप्रांतीयाला अटक.
Total Views: 106