बातम्या
कोल्हापुरात मद्यपी टोळक्याचा कहर; खासगी बसवर दगडफेक, चालकावर चाकूहल्ला
By nisha patil - 9/9/2025 2:52:32 PM
Share This News:
कोल्हापुरात मद्यपी टोळक्याचा कहर; खासगी बसवर दगडफेक, चालकावर चाकूहल्ला
कोल्हापुरात मद्यपी टोळक्याने उपद्रव माजवत खासगी ट्रॅव्हल्स बसवर दगडफेक केली. आजराहून पुण्याकडे जाणाऱ्या बसला दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी हॉर्न वाजवल्याचा राग काढत लक्ष्य केले. या हल्ल्यात बसच्या चालकावर चाकूहल्लाही करण्यात आला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आरडाओरड वाढताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी धाव घेतली असून संशयितांचा शोध सुरू आहे.
कोल्हापुरात मद्यपी टोळक्याचा कहर; खासगी बसवर दगडफेक, चालकावर चाकूहल्ला
|