बातम्या

हातात कोयता, नशेत तरुण! नेहरूनगरात पोलिसांची धडक कारवाई

Drunk youth with sickle in hand


By nisha patil - 11/19/2026 3:13:29 PM
Share This News:



हातात कोयता, नशेत तरुण! नेहरूनगरात पोलिसांची धडक कारवाई

कोल्हापुरातील नेहरूनगर परिसरात गांजा सेवन करून हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. साकिब फिरोज अत्तार वय २६, रा. साळुंखे पार्क, कोल्हापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे. १९ नोव्हेंबर रोजी आयसोलेशन हॉस्पिटलसमोरील मंदिराजवळ एक तरुण गांजा सेवन करून हातात हत्यार घेऊन दहशत पसरवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या साकिबला पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अर्धवट जळालेली गांजाची सिगारेट आणि कोयता आढळून आला. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, साकिब अत्तारला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ किंवा दारूचे सेवन करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


हातात कोयता, नशेत तरुण! नेहरूनगरात पोलिसांची धडक कारवाई
Total Views: 14