बातम्या
डॉ. दीपक तुपे यांचा डॉ. देवीदास बामणे ‘संघर्ष’ अनुवाद पुरस्कार देऊन सत्कार
By Administrator - 1/13/2026 5:53:06 PM
Share This News:
डॉ. दीपक तुपे यांचा डॉ. देवीदास बामणे ‘संघर्ष’ अनुवाद पुरस्कार देऊन सत्कार
कोल्हापूर दि. 13 : महाराष्ट्र हिंदी परिषदेच्यावतीने विवेकानंद कॉलेजचे हिंदी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. दीपक तुपे यांना नुकतेच डॉ. देवीदास बामणे ‘संघर्ष’ अनुवाद पुरस्काराने गौरविण्यात आले. विवेकानंद कॉलेज आणि महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या वतीने आयोजित 32 वें अधिवेशन व दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. वसंत मोरे यांच्या हस्ते रोख रक्क्म, सम्मानपत्र, सम्मानचिह्न, शॉल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल काळे, मुख्य सचिव डॉ. गजानन चव्हाण, सोलापूर विद्यापीठ, डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील माजी विभागप्रमुख प्रो. डॉ. चंद्रदेव कवडे, विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय थोरात, शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. पांडुरंग पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. गजानन चव्हाण, डॉ. माधवी जाधव, आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. पंढरीनाथ पाटील, डॉ. देवीदास बामणे, डॉ. नाजिम शेख, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ सुरेश शेळके, डॉ विठृलसिंह ढाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. तुपे यांना पदवी-पदव्युत्तर अध्यापनाचा 15 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी यूजीसीच्या तीन बृहत शोध प्रकल्प वर परियोजना सहायक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी दोन लघु शोध प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांनी दैनिक लोकमत समाचारच्या कोल्हापूर व पुणे आवृत्यांमध्ये संवाददाता, अनुवादक, उप संपादक म्हणून काम पाहिले आहे. त्यांची सहा पुस्तके आणि 80 शोध निबंध प्रकाशित आहेत. त्यांनी राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरावर विभिन्न सामाजिक-शैक्षिक विषयांवर पन्नासहून अधिक व्याख्याने दिली आहेत. ते संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांना लोकमतचा प्ररेणादायी व्यक्तित्व पुरस्कार (2022), भारतेंदु हरिश्चंद्र राष्ट्रभाषा हिंदी गौरव सम्मान (2022), हिंदी रत्न सम्मान (2025) पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. तुपे यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ. दीपक तुपे यांचा डॉ. देवीदास बामणे ‘संघर्ष’ अनुवाद पुरस्कार देऊन सत्कार
|