बातम्या

दसरा महोत्सवास निधी न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव – रविकिरण इंगवले

Dussehra festival


By nisha patil - 9/19/2025 1:33:14 PM
Share This News:



दसरा महोत्सवास निधी न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव – रविकिरण इंगवले

छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेला व कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेचा भाग असणाऱ्या दसरा महोत्सवाला राज्य शासनाने निधी न दिल्याबद्दल शिवसेनेतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधींची जाहिरातबाजी होत असताना दसरा महोत्सवास निधी न देणे ही कोल्हापूरच्या परंपरेचा अपमानकारक बाब असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

राज्य शासनाने दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असला तरी निधीची एकही तरतूद केलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसहभागातून महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यावर इंगवले यांनी, “हे शासनाच्या करंटेपणाचे लक्षण असून कोल्हापूरकरांशी सापत्न वागणूक दिली जात आहे. शासनाने तातडीने निधी द्यावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून पालकमंत्र्यांना घेराव घालेल व तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा दिला.

या वेळी शहर प्रमुख सुनिल मोदी, महिला जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तुरे, उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, महिला शहर संघटक रिमा देशपांडे, महिला शहर संघटक जाहिदा खान, तसेच मंजीत माने युवा सेना जिल्हाध्यक्ष व कृष्णा जाधव युवती सेना जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

 


दसरा महोत्सवास निधी न मिळाल्यास पालकमंत्र्यांना घेराव – रविकिरण इंगवले
Total Views: 102