बातम्या

शेंडूर (ता. कागल) येथे दसरा महोत्सव उत्साहात साजरा ; कलाकारांनी उलगडले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

Dussehra festival celebrated with great enthusiasm


By nisha patil - 10/22/2026 11:33:40 AM
Share This News:



शेंडूर (ता. कागल) येथे दसरा महोत्सव उत्साहात साजरा ; कलाकारांनी उलगडले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

कागल प्रतिनिधी - अजित बोडके कागल तालुक्यातील शेंडूर येथे दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. येथील स्थानिक कलाकारांनी आपल्या कलेतून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे आणि परंपरेचे जिवंत दर्शन घडवले.

या महोत्सवात जागर, गोंधळ, ठाकर-ठाकर, काळभैरव-रेणुका जागर, ललकारी, भंडारा, शिवराज्याभिषेक सोहळा, लोकगीते अशा विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपारिक वेशभूषेत सादर झालेल्या या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राची संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, हा संदेश अत्यंत नम्रपणे आणि प्रभावीपणे देण्यात आला. उपस्थितांना यावेळी अध्यात्मिक आणि सांस्कृतिक दर्शनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

याचबरोबर यावर्षी विशेष आकर्षण म्हणून 'स्त्री सन्मान' या विषयावर देखावा सादर करण्यात आला, ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श शासन पद्धतीचा देखावा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला, ज्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळाली.

या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शेंडूर गावात दसऱ्याचा उत्सव केवळ सण न राहता, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करण्याचे उत्तम उदाहरण ठरला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व कलाकारांनी विशेष परिश्रम घेतले.


शेंडूर (ता. कागल) येथे दसरा महोत्सव उत्साहात साजरा ; कलाकारांनी उलगडले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
Total Views: 2