ताज्या बातम्या

जवाहर नगर दत्त कॉलनीत दत्त जयंती सोहळा संपन्न; भक्तिमय वातावरण

Dutt Jayanti celebrations held in Jawahar Nagar Dutt Colony


By nisha patil - 8/12/2025 12:11:09 PM
Share This News:



 जवाहर नगर दत्त कॉलनीत दत्त जयंती निमित्त महाप्रसाद व कीर्तन सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमात भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तनाचा लाभ घेतला .

सोहळ्यात माजी नगरसेवक भूपाल शेटे तसेच समाजसेवक शहादाब अत्तार व सना आत्तार यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाची शोभा वाढवली.  भक्तजनांनी कीर्तनात सहभागी होऊन आध्यात्मिक आनंद घेतला आणि महाप्रसादाचा लाभही घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन अभिजीत सोनवणे सरकार यांनी केले होते. यावेळी भागातील नागरिकामीही मोठ्या संख्येने सहभागी होत नियोजनबद्ध कार्यक्रम होण्यासाठी सहकार्य केले. यावेळी आयोजकांनी अशा भक्तिपूर्ण सोहळ्यांमुळे समाजात एकात्मता, स्नेह आणि परस्पर आदर वाढत असल्यामुळे भविष्यात असे कार्यक्रम करणे महत्त्वाचे असल्यास देखील नमूद केलं.

संपूर्ण सोहळा शांत, भक्तिपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. भक्तांनी कीर्तनाचा अनुभव घेतला, महाप्रसाद घेतला आणि दत्त जयंतीचा सण अधिक स्मरणीय बनविला.


जवाहर नगर दत्त कॉलनीत दत्त जयंती सोहळा संपन्न; भक्तिमय वातावरण
Total Views: 21