राजकीय

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य; अडचणींवरून अजित पवारांचे स्पष्टीकरण

E KYC mandatory for Ladki Bhaeen scheme


By nisha patil - 10/13/2025 12:26:03 PM
Share This News:



मुंबई :- ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, दोन महिन्यांच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. निर्धारित कालावधीत केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित महिलांना पुढील हप्ता मिळणार नाही. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले की,

“केवायसी करताना काही अडचणी येत आहेत, पण निधी फक्त पात्र लाभार्थींनाच मिळावा यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. जर गरज वाटली तर मुदत वाढवू, पण केवायसी करणे बंधनकारकच राहील.”

ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर विरोधकांनी सुरुवातीपासूनच टीका केली होती. मात्र, योजना सुरूच राहिली असून सरकारने पारदर्शकतेसाठी केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी दिवाळीत सुरू करण्यात आलेली ‘आनंदाचा शिधा’ योजना निधीअभावी बंद करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले –

“काही योजना त्या-त्या वेळच्या परिस्थितीनुसार बदलल्या जातात. ‘लाडकी बहीण’ योजनेत अधिक लाभार्थी आहेत, त्यामुळे सरकार तिच्याबाबत सकारात्मक आहे.”


लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य; अडचणींवरून अजित पवारांचे स्पष्टीकरण मुंबई :
Total Views: 66