बातम्या

इंचलकंरजीसाठी नियोजित राधाकृष्ण पाणी योजनेस दानवाड पंचक्रोशीतुन प्रचंड विरोध*

Echalkaranji


By nisha patil - 6/13/2026 10:24:00 PM
Share This News:



*इंचलकंरजीसाठी नियोजित राधाकृष्ण पाणी योजनेस दानवाड पंचक्रोशीतुन प्रचंड विरोध* .

आज शनिवारी सायंकाळी दानवाड येथील मारुती मंदिरामध्ये नियोजित राधाकृष्ण पाणी योजना विरोधात दानवाड पंचक्रोशीतील गावांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस टाकळी टाकळीवाडी खिद्रापूर राजापूर राजापूर वाडी येथील लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाकडून इचलकरंजी साठी दानवाड येथील राधाकृष्ण संगमावरून पाणीपुरवठा योजनेची घोषणा करण्यात आली. त्याबद्दल तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विरोध करणं अपेक्षित होतं पण त्याबाबतीत आजही ते मौन बाळगून आहेत.यावेळी त्यांच्या या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली. 

 मुळात कृष्णा नदीच्या राजापूर बंधाऱ्याखालील गावांना तसेच दुधगंगा काठावरील गावांना प्रत्येक वर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तिथल्या सर्व गावांचा पाणीपुरवठा शेतीचा पाणीपुरवठा या कृष्णा व दुधगंगा नदीवर अवलंबून आहे. जर ही योजना या ठिकाणी लादली तर इथल्या दहा-बारा गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे ही योजना कोणत्याही परिस्थितीत रद्द करा असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

त्यासाठी राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समितीचि स्थापना या ठिकाणी करण्यात आली. याद्वारे नियोजित इचरकंजी पाणीपुरवठा योजना रद्द करावी पंचगंगा प्रदूषण मुक्त करून त्या ठिकाणाहूनच इचलकरंजी शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा करावा असे ठराव करण्यात आले. अशा पद्धतीने गावागावातून ग्रामसभेचे ठराव करून त्या ठरावाच्या प्रती निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभाग यांना देण्याचे ठरले.

 याउपर ही योजना शिरोळ तालुक्याच्या या भागावर लादण्याचा प्रयत्न केल्यास व्यापक जन आंदोलन छेडण्याचे ठरले .यावेळी विविध गावातून आलेले सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच आक्रोश समितीचे प्रमुख आणि दानवाडचे सरपंच डॉ. सी डी पाटील ,संतोष आठवले,आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील , राकेश जगदाळे काँग्रेसचे उदय पाटील, स्वाभिमानीचे बंडू चौगुले, खंडेराव चव्हाण ,शामराव पाटील, उत्तम कांबळे , संजय धनगर ,राहुल कांबळे विजय पाटील,दीपक कांबळे, सुकुमार पाटील, दगडू कांबळे कपिल पाटील , हैदर मोकाशी , कुलदीप कदम,रणजीत पाटील इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इंचलकंरजीसाठी नियोजित राधाकृष्ण पाणी योजनेस दानवाड पंचक्रोशीतुन प्रचंड विरोध*
Total Views: 10