बातम्या
इचलकरंजीत बनावट दारू अड्ड्यावर छापा; 94 हजारांचा मुद्देमाल जप्त
By nisha patil - 7/23/2025 3:54:47 PM
Share This News:
इचलकरंजीत बनावट दारू अड्ड्यावर छापा; 94 हजारांचा मुद्देमाल जप्त
दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
दिनांक 21 जुलै 2025 रोजी इचलकरंजी पथकाने शिरढोण (ता. शिरोळ) व नदिवेशनाका परिसरात छापा टाकून अवैध देशी व विदेशी मद्य निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. सदर कारवाई मा. आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिचाळकर, अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत संशयित अविनाश मधुकर गोलंगडे (वय 57, रा. गावभाग, इचलकरंजी) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान, बनावट देशी दारू, देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, पॅकिंग मशीन, मोबाईल, स्कुटर, ग्राहकांची नावे असलेली वही, तसेच इतर साहित्य मिळून एकूण ₹94,941/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत निरीक्षक ए. एस. कोळी, दुय्यम निरीक्षक एम. पी. खेत्री, एस. एस. हिंगे, अजित बोंगाळे, वाहनचालक वैभव शिंदे व जवान सुभाष कोले, मुकेश माळगे, आदित्य कोळी सहभागी झाले होते. पुढील तपास निरीक्षक ए. एस. कोळी करीत आहेत.
इचलकरंजीत बनावट दारू अड्ड्यावर छापा; 94 हजारांचा मुद्देमाल जप्त
|