शैक्षणिक
शहाजी महाविद्यालय मध्ये पर्यावरण पूरक दसरा व रान भाजी पाककृती स्पर्धा संपन्न
By nisha patil - 1/10/2025 3:30:43 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालय मध्ये पर्यावरण पूरक दसरा व रान भाजी पाककृती स्पर्धा संपन्न
कोल्हापूर: शहाजी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण पूरक दसरा व रानभाज्यांचा पाककृती स्पर्धा कार्यक्रम ,आज दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के . शानेदिवाण होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कु.पी.वाय.दोडमानी (सह.प्राध्यापक वनस्पतीशास्त्र) महावीर कॉलेज, कोल्हापूर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्रबंधक रविंद्र भोसले , कार्यालयीन अधीक्षक मनीष भोसले ,IQAC समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर , IQAC सह समन्वयक डॉ.ए.बी.बलुगडे ,परीक्षा विभाग प्रमुख डॉ. के. एम.देसाई यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्रार्थनेने झाली.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. सौ. ए.व्ही.मगदूम- पाटील मॅडम( वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख व विज्ञान समन्वयक) यांनी केले .प्रास्ताविकेमध्ये त्यांनी पर्यावरण पूरक दसरा या कार्यक्रमाचे महत्त्व त्याचबरोबर वृक्षाचे मानवाशी असलेले नाते अधिक वृद्धिगत होण्याच्या उद्देशाने व वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने आजचा हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाचा हेतू सांगितला विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर बघितल्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊनच विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार घडवण्यासाठी सदैव कार्यक्षम राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. प्रज्ञा उन्हाळे ,B.Sc-II ची विद्यार्थिनी यांनी केले. याप्रसंगी विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी श्री शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग दादा बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
शहाजी महाविद्यालय मध्ये पर्यावरण पूरक दसरा व रान भाजी पाककृती स्पर्धा संपन्न
|