बातम्या

विवेकानंद मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यशाळा संपन्न

Eco friendly Ganeshotsav


By nisha patil - 8/21/2025 4:08:21 PM
Share This News:



विवेकानंद मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर दि.21 : येथील विवेकानंद कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवा दरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर, लेझर लाईट आणि जलप्रदुषण  याबाबत जाणीव जागृती निर्माण करण्याच्या हेतूने कार्यशाळेचे  आयोजन विवेकानंद कॉलेजमध्ये करण्यात आले होते.

या कार्यक्रमात  शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या विभाग प्रमुख डॉ.आसावरी जाधव यांनी गणेशोत्सव काळात विविध प्रकारे होणाऱ्या प्रदुषणाबाबत माहिती देऊन सदरचे प्रदुषण कसे टाळता येईल याबाबत मार्गदर्शन केले.  तसेच यावेळी विद्यार्थ्यांना पथनाटयाव्दारे जनजागृती केली.  या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

यावेळी  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप पाटील, प्रा. पी. आर.बागडे, प्रा. हेमंत पाटील, डॉ. बी.टी.दांगट, डॉ.राजश्री  पाटील तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे  व  स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


विवेकानंद मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यशाळा संपन्न
Total Views: 101