बातम्या
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये इको-फ्रेंडली गणेशोत्सव उपक्रम
By nisha patil - 8/23/2025 4:27:09 PM
Share This News:
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये इको-फ्रेंडली गणेशोत्सव उपक्रम
कोल्हापूर : १४४ वर्षांच्या परंपरेची प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा व स्पर्धा तसेच प्लास्टिक कचरा निर्मूलन व जागृती या विषयावर विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले.
कलाशिक्षक प्रशांत जाधव, रोहित कुंभार व सुनील गोंधळी यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती घरीच कशी तयार करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींचे प्रदर्शन भरवून त्या घरोघरी पूजनासाठी देण्यात आल्या.
तसेच प्लास्टिक प्रदूषण जागृती या विषयावर डॉ. सौ. विदुला स्वामी, सौ. सविता साळोखे, श्री. सुनील पाच्छापुरे व श्री. सुहास आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत विजेत्यांना कापडी पिशवी व पर्यावरणपूरक साहित्य देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एम. कुंभार यांनी, तर आभारप्रदर्शन सौ. एस.के. देसाई यांनी केले. मुख्याध्यापक जी.एस. जांभळीकर यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये इको-फ्रेंडली गणेशोत्सव उपक्रम
|