राजकीय
📰 शिक्षक मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा नसल्याने गैरसोय; शिक्षित मतदारांची नाराजी
By nisha patil - 11/10/2025 12:12:47 PM
Share This News:
कोल्हापूर :
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मात्र, शिक्षकांसाठी ही नोंदणी प्रक्रिया अजूनही फक्त ऑफलाईन पद्धतीनेच केली जात असल्याने शिक्षित मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सामान्य नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा सहज उपलब्ध असताना,
शिक्षक जे स्वतः उच्चशिक्षित आणि तंत्रज्ञानस्नेही आहेत , त्यांच्यासाठी मात्र पारंपरिक, कागदपत्रांच्या चकरा माराव्या लागणारी पद्धत अजूनही कायम आहे.
शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागत आहे.
यामुळे वेळ, प्रवास आणि कागदपत्रांच्या पडताळणीची गैरसोय होत आहे.
दुसरीकडे, पदवीधर मतदार https://mahaelection.gov.in या संकेतस्थळावरून सहजपणे ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
शिक्षक मतदारांसाठीही अशीच सोय सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे.
ही मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली असून,
अजूनही ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू झालेली नाही.
त्यामुळे शिक्षित मतदारांना ‘डिजिटल महाराष्ट्रातही अजून पारंपरिक प्रक्रियेतच अडकावं लागतंय’ अशी भावना व्यक्त होत आहे.
📰 शिक्षक मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा नसल्याने गैरसोय; शिक्षित मतदारांची नाराजी
|