बातम्या
अधिकृत शाळांमध्ये अनाधिकृत वर्गांवर शिक्षण विभागाची कारवाई
By nisha patil - 9/27/2025 5:51:19 PM
Share This News:
अधिकृत शाळांमध्ये अनाधिकृत वर्गांवर शिक्षण विभागाची कारवाई
मुख्याध्यापक डी.सी. कुंभार यांचा भरारीपथकाबाबत इशारा
अनाधिकृत शाळा बंद केल्यानंतरही अधिकृत शाळांमध्ये अनाधिकृत वर्ग सुरु असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याबाबत शिक्षण विभाग भरारीपथक सज्ज करून कारवाई करण्याची तयारी करत आहे, असे महापालिकेचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांनी दादासाहेब मगदूम हायस्कूल येथे आयोजित शहरस्तरीय मुख्याध्यापक सहविचारसभेत सांगितले.
सहविचारसभेत पॅट परीक्षा, एन.एम.एम.एस. परीक्षा, आधार व्हॅलीड विद्यार्थी, शाळाबाह्य विद्यार्थी आणि युडायस प्लस पोर्टलवरील ऑनलाईन काम यावर मार्गदर्शन देण्यात आले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे, शशिकांत सावंत, विजय भोगम, वृषाली कुलकर्णी, दगडू रायकर यांसह शहरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
अधिकृत शाळांमध्ये अनाधिकृत वर्गांवर शिक्षण विभागाची कारवाई
|