शैक्षणिक
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील १३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By nisha patil - 7/31/2026 1:49:11 PM
Share This News:
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील १३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
प्रतिनिधी अजित बोडके कोते, ता. राधानगरी : "८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण" या शिवसेनेच्या विचाराला साजेसा उपक्रम राबवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुख्य नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोते येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व दैनंदिन उपयोगी साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. दराडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी आपल्या मनोगतात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असल्याचे सांगितले. या उपक्रमांतर्गत आश्रमशाळेतील १३५ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच दैनंदिन उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान विशेष लक्षवेधी ठरले.
यावेळी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक व कार्यकर्त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महिला जिल्हा संघटिका विमलताई पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक रविंद्र पाटील, शेतकरी सेना उपजिल्हाप्रमुख विक्रम पाटील, महिला तालुका संघटिका कल्पना भोसले, उपतालुका महिला संघटिका दिपाली कानकेकर व जयश्री पवार, उपतालुका प्रमुख सागर पाटील, दीपक तेली, उत्तम शेटके, अरुण खामकर, विभाग प्रमुख सातप्पा नरके, जमीर ताशीलदार, सदाशिव पाटील, रघुनाथ जोशी, युवासेना तालुका प्रमुख अविनाश परीट, तसेच ज्येष्ठ शिवसैनिक आनंदा पाटील, संभाजी पाटील, महादेव पाटील, चंद्रकांत बुगडे, बाळासो पोवार, राजेंद्र जाधव, साहेबजी नाईक, कृष्णात अस्वले, ओंकार आरडे, प्रसाद डवर यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन शाळा प्रशासनाने उत्कृष्टरीत्या पार पाडले.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील १३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
|