राजकीय

एमआयडीसीची तूट भरून काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात – विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे

Effective measures should be taken to fill the deficit of MIDC


By nisha patil - 10/29/2025 12:11:10 PM
Share This News:



मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) आर्थिक तूट भरून काढण्यासाठी विभागाने ठोस आणि प्रभावी निर्णय घ्यावेत, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या. विधान भवन, मुंबई येथे पावसाळी अधिवेशन–२०२५ दरम्यान, विधानपरिषद सदस्य श्री. शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न क्रमांक ३००५ संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत उद्योग राज्यमंत्री श्री. इंद्रनील नाईक, आमदार श्री. शशिकांत शिंदे, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (४) श्री. शिवदर्शन साठ्ये, सह सचिव श्री. राजेश तारवी आणि उप सचिव श्री. मोहन काकड उपस्थित होते.

बैठकीदरम्यान एमआयडीसीशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यात पाणी दरवाढ, एमआयडीसीच्या जमिनी उद्योगांना देताना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे निर्माण होणारी तूट, तसेच भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांना घालण्यात येणाऱ्या अटी यांचा समावेश होता.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी उद्योग विभागाला या सर्व मुद्यांवर परिणामकारक उपाययोजना आखण्याच्या आणि एमआयडीसीची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी ठोस निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या.

 


एमआयडीसीची तूट भरून काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात – विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
Total Views: 42