आरोग्य
शरीरातील अशक्तपणा कमी करण्याचे.... प्रभावी उपाय..
By nisha patil - 7/16/2025 7:29:59 AM
Share This News:
शरीरातील अशक्तपणा कमी करण्याचे.... प्रभावी उपाय....👇
१) दालचिनी चूर्ण__\ सतत थकवा येत असेल तर, दालचिनी चूर्ण मधात मिसळून घ्यावे..
२) अश्वगंधा चूर्ण-\.
दिवसात दोन वेळा दुधाबरोबर जायफळ,जावित्रि व अश्वगंधा चूर्ण सेवन केल्याने शरिरात शक्ति येते. त्याचबरोबर रक्ताचि कमतरता दूर होते, ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो..##क्रुति...एक कप दुधात एक चमचा भरून अश्वगंधा चूर्ण घ्यावे चिमुटभर जायफळ पूड, व चिमूटभर जायपत्री, चविला साखर मिसळून एक उकळी आली की मग थंड करून प्यावे....
३) खजूरादि मंथ_\ .. यामध्ये खजुर५, आवळा १, आमसूल १ चमचा, काळे मनुके २०, डाळिंब दाणे १ मूठ, हे एकत्र भिजवून ठेवा दोन तास. नंतर चांगलं कुस्करून गाळून घ्यावे व हे पाणी घोट घोट घ्यायचं. यामुळे अशक्तपणा लवकर जातो.
४) साळ्याच्या लाह्यांचे मिश्रण_\ खूपच थकवा येत असेल तर, साळिच्या किंवा ज्वारिच्या लाह्या दूध घालून घ्यावे खडिसाखर मिसळून घ्यावे
५) तुपावर तळलेला डिंक व दूध_\. हे मिसळून सकाळ-संध्याकाळ घ्या, याने अशक्तपणा दूर होईल,. हाडं मजबूत होतात
६) तांदळाची पेज._\. तांदळाची पेज शिजवून घ्यावे, ज्वारिची आंबिल, उकड, नाचणीचे सत्त्व दूधात शिजवून घ्यावे.., मुगाचे पौष्टीक कढण द्या..
७) अळीव खिर_\. रात्री झोपण्यापूर्वी अळिव दुधात भिजवून ठेवा, मग सकाळी यात सुका मेवा टाका, दुध गुळ, विलायचि टाकून उकळून घ्यावे व प्यावे..याने खुप ताकद येते..
८) कोहळ्याचचे. गुळशेल किंवा पेठा.. सकाळी खावे...कोहळे किसून दूधातून शिजवून घ्या.. व हि बलदायि खिर खावि. पित्त शामक आहे...
९) आवळा._\ एक कच्चा आवळा किंवा मुरंबा जेवणानंतर खावा, प्रतिकार शक्ती वाढवते.
१०) अशक्तपणा वर पौष्टिक पेय_\. एक डाळिंब, एक गाजर, एक बीट, व एक सफरचंद याचा रस काढून एक चमचा भरून मध मिसळून घ्यावे..
११) शुद्ध तुपात कांदा भाजून यांचे नियमित पणे सेवनाने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. व फुफ्फुसे बळकट होतात
. १२) अंजिर, खजूर, बदाम, व लोणि एकत्र करून खावे पंधरा दिवसांत तरतरी येते.##क्रुति.. दोन अंजिर, एक खजुर व दोन बदाम हे मिक्सरमध्ये वाटून घ्या, मग एक चमचा भरून लोणी मिसळून, व किंचित विलायचि पुड घालावी, छान मिक्स करावे व खावे, चव छान लागते. थकवा जातो..
१३). दोन चमचे तिळ दोन तास भिजत ठेवून, नंतर याचि पेस्ट बनवून घ्या. यात मध मिसळून घ्यावे व दिवसातून दोन वेळा घ्या. याने नवीन रक्त तयार होते.
१४) टोमॅटो*यात भरपूर विटामिन सी, असते, त्यामुळे थकवा दूर होतो. तेव्हा रोज. सूप, सार, कोशिंबीर , सलाड. अश्या स्वरूपात खावे*
शरीरातील अशक्तपणा कमी करण्याचे.... प्रभावी उपाय..
|