बातम्या
कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील
By nisha patil - 5/16/2025 3:12:59 PM
Share This News:
कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री*
कोल्हापूर येथे विमानतळ उभारण्याची संकल्पना ज्यांनी मांडली, त्या ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांच्या नावाने या विमानतळाचे नामकरण व्हावे, ही कोल्हापूरकरांची दीर्घकालीन मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्राप्त झाला असून, मंत्रिमंडळात त्याला मंजुरी मिळावी यासाठी सर्वजण प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते आज कोल्हापूर विमानतळावरील नव्याने उभारलेल्या सुसज्ज एटीसी टॉवर, तांत्रिक इमारत, व्हीआयपी आरक्षित कक्ष आणि अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याचबरोबर ‘स्टार एअर’च्या कोल्हापूर-नागपूर विमानसेवेचाही शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, भाविप्रा सदस्य (ANS) एम. सुरेश, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, विमानतळ संचालक अनिल ह. शिंदे उपस्थित होते..
कोल्हापूर विमानतळाला ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील
|