बातम्या
बिंदू चौक येथे १७ मार्चला ‘ईद फेस्टिवल’चे उद्घाटन; रूपाराणी निकम यांच्या हस्ते शुभारंभ
By Administrator - 3/13/2026 3:18:21 PM
Share This News:
बिंदू चौक येथे १७ मार्चला ‘ईद फेस्टिवल’चे उद्घाटन; रूपाराणी निकम यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद निमित्त बिंदू चौक येथील पार्किंग जागेत ‘ईद फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी संग्रामसिंह निकम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयेशभाई कदम असणार आहेत.
या कार्यक्रमाला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सदस्य कौसर बागवान, शिवसेना गटनेते सारंगधर देशमुख, शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित (नाना) कदम, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते आदिल फरास, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संस्थापक गणी आजरेकर यांनी २८ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे. ईद फेस्टिवलमध्ये सुकामेवा, मसाले, शेवया, साखर, कांदे, लसूण, किचन साहित्य तसेच इतर अत्यावश्यक वस्तू ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच खास बिर्याणी तांदूळ ५ व १० किलोच्या पॅकमध्ये सवलतीच्या दरात मिळणार आहेत.
या ईद फेस्टिवलचा लाभ सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बिंदू चौक येथे १७ मार्चला ‘ईद फेस्टिवल’चे उद्घाटन; रूपाराणी निकम यांच्या हस्ते शुभारंभ
|