बातम्या

जिल्ह्यात निवडणुकीचा जंगी जल्लोष; माघारीनंतर ८६५ उमेदवार मैदानात!

Election fervor rages in the district

By nisha patil - 11/22/2025 4:09:37 PM
Share This News:

जिल्ह्यात निवडणुकीचा जंगी जल्लोष; माघारीनंतर ८६५ उमेदवार मैदानात!

माघारीची अंतिम घंटा वाजताच जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतींमध्ये खरी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी तब्बल ५६ तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात ठाम उभे राहिले आहेत.

३७ अध्यक्षपदाचे आणि ३३४ सदस्यपदाचे अर्ज मागे गेल्याने आता लढती अधिक चुरशीच्या, काट्याच्या ठरणार आहेत. अपिलातील उमेदवारांचे भवितव्य २५ तारखेला ठरणार असून अपक्षांना २६ ला चिन्हवाटपाचा मुहूर्त लागणार आहे. २ डिसेंबरचे मतदान आणि ३ डिसेंबरची मतमोजणी गाठण्यासाठी पक्षांनीही प्रचारयुद्धाला जोर पकडला असून गावागावांत आजपासूनच ढोल-ताशांत राजकारण तापणार आहे!

जिल्ह्यात निवडणुकीचा जंगी जल्लोष; माघारीनंतर ८६५ उमेदवार मैदानात!
Total Views: 24