राजकीय
महाराष्ट्रात निवडणुकीचे तापमान वाढले; नगरपालिका–नगरपंचायतींच्या उमेदवारीचा आज शेवटचा दिवस
By nisha patil - 11/19/2025 12:19:35 PM
Share This News:
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून, राज्यातील संपूर्ण राजकारणाला आता स्पष्टपणे तापलेले स्वरूप आले आहे. पहिल्या टप्प्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षांसाठी संघटनविस्ताराची उत्तम संधी, आणि कार्यकर्त्यांसाठी नेतृत्व घडविण्याचे पहिले पाऊल मानल्या जातात. आमदार-खासदार अशा मोठ्या निवडणुकांमध्ये मर्यादित लोकांना तिकीट मिळते; परंतु स्थानिक संस्थांमध्ये हजारो कार्यकर्त्यांना नेतृत्व उभं करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होते. येथूनच पुढे भावी आमदार, खासदार आणि मंत्री निर्माण होतात.
आज नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने, राज्यभरात स्थानिक पातळीवरील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीचे तापमान वाढले; नगरपालिका–नगरपंचायतींच्या उमेदवारीचा आज शेवटचा दिवस
|