राजकीय

रणनिती, कागदपत्रे आणि कायदेशीर मार्गदर्शनाची सर्वसमावेशक तयारी

Election training workshop tomorrow for Shiv Sena aspiring candidates


By nisha patil - 11/12/2025 2:24:18 PM
Share This News:



 कोल्हापूरमध्ये “मिशन कोल्हापूर महानगरपालिका” अंतर्गत उद्या (दि.12 डिसेंबर) शिवसेना इच्छुक उमेदवारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यशाळेत आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आवश्यक रणनिती, जनसंपर्क तंत्र, शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे मार्ग तसेच निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर सल्ले आणि खर्च हिशोबाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी ही माहिती प्रसिद्ध करताना सांगितले की, नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना पक्षाचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ आणि मयूर कदम मार्गदर्शन करणार असून सर्व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे


रणनिती, कागदपत्रे आणि कायदेशीर मार्गदर्शनाची सर्वसमावेशक तयारी
Total Views: 28