बातम्या
राज्यातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा; २३ ऑक्टोबरला मतदान
By nisha patil - 9/22/2026 2:15:39 PM
Share This News:
राज्यातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा; २३ ऑक्टोबरला मतदान
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील पाच शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीत अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. निवडणुकीच्या घोषणेमुळे संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या तयारीसह प्रचाराचे नियोजनही आता सुरू होणार आहे.
राज्यातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा; २३ ऑक्टोबरला मतदान
|