बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; कागल तालुका प्रमुखपदी अजित मोडेकर व अशोक पाटील यांची निवड

Elections of Shiv Sena office bearers in Kolhapur district announced


By nisha patil - 11/14/2026 10:00:42 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; कागल तालुका प्रमुखपदी अजित मोडेकर व अशोक पाटील यांची निवड

कागल : प्रतिनिधी अजित बोडके शिवसेना भवन येथून नुकत्याच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडीमध्ये कागल तालुका प्रमुखपदी अजित मोडेकर व अशोक पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कागल तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे, तळागाळातील शिवसैनिकांना एकत्रित करून पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.

अजित मोडेकर व अशोक पाटील यांच्या निवडीमुळे कागल तालुक्यात शिवसेनेला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक जोमाने कार्यरत होईल, असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नवनियुक्त तालुका प्रमुखांचे शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर; कागल तालुका प्रमुखपदी अजित मोडेकर व अशोक पाटील यांची निवड
Total Views: 15