बातम्या

तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन

Electricity 2


By nisha patil - 5/10/2025 11:23:58 PM
Share This News:



तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन

आजरा (हसन तकीलदार): महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही सरकारी वीज कंपन्यांमधील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी संघटनांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगार संघटनांचा आरोप आहे की सरकार कामगारविरोधी धोरणे राबवून एकतर्फी निर्णय घेत आहे. महावितरणमधील रीस्ट्रक्चरिंग, उपकेंद्रांचे कंत्राटीकरण, प्रकल्पांचे खाजगीकरण या निर्णयांना त्यांनी विरोध दर्शवला आहे.

मुख्य मागण्यांमध्ये रिक्त पदे भरणे, पेन्शन योजना लागू करणे, रीस्ट्रक्चरिंग थांबवणे यांचा समावेश आहे.

या मागण्यांसाठी 29 सप्टेंबरपासून सिमकार्ड जमा करणे, 1 ते 9 ऑक्टोबरदरम्यान विविध स्तरांवर धरणे, ठिय्या, द्वारसभा आणि लाक्षणिक संप अशा स्वरूपात आंदोलन होणार असल्याची माहिती वीज क्षेत्र बचाव कृती समितीने दिली.

 


तिन्ही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन
Total Views: 49