बातम्या
गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात सवलतीची शक्यता
By nisha patil - 7/22/2025 6:01:54 PM
Share This News:
गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात सवलतीची शक्यता
गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांना वीज बिलात विशेष सवलत देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
सध्या १०० युनिटपर्यंत ₹४.७१ आणि त्यानंतर ₹१०.२९ ते ₹१६.६४ प्रति युनिट दराने बिल आकारले जाते. गणेशोत्सव काळात होणारा जास्त वीज वापर लक्षात घेता, १०० युनिटवरील वापरासाठीही ₹४.७१ चाच दर लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. लवकरच सवलतीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात सवलतीची शक्यता
|