बातम्या

कोल्हापूर परिमंडलात 50 कोटी 49 लाखांची वीजबिल थकबाकी

Electricity bill arrears of Rs 50 crore 49 lakh in Kolhapur circle


By Administrator - 12/3/2026 12:55:08 PM
Share This News:



कोल्हापूर परिमंडलात 50 कोटी 49 लाखांची वीजबिल थकबाकी

09 हजार 871 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित

ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरण

कोल्हापूर/सांगली, दि. 11 मार्च 2026: विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 03 लाख 08 हजार 595 ग्राहकांकडे 50 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकवणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील 09 हजार 871 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 5 हजार 378 तर सांगली जिल्ह्यातील 4 हजार 493 ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती 02 लाख 68 हजार 161 ग्राहकांकडे 25 कोटी 59 लाख, व्यावसायिक 25 हजार 665 ग्राहकांकडे 08 कोटी 04 लाख, औद्योगिक 08 हजार 287 ग्राहकांकडे 13 कोटी 05 लाख, सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 05 हजार 82 ग्राहकांकडे 03 कोटी 23 लाख आणि इतर वर्गवारीतील 01 हजार 400 ग्राहकांकडे 56 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर विभागात एकूण 20 हजार 763 ग्राहकांकडे 03 कोटी 54 लाख, कोल्हापूर ग्रामीण-1 विभागात 32 हजार 01 ग्राहकांकडे 02 कोटी 50 लाख, कोल्हापूर ग्रामीण-2 विभागात 36 हजार 200 ग्राहकांकडे 05 कोटी 58 लाख, जयसिंगपूर विभागात 26 हजार 432 ग्राहकांकडे 03 कोटी 68 लाख, इचलकरंजी विभागात 20 हजार 955 ग्राहकांकडे 08 कोटी 74 लाख व गडहिंग्लज विभागात 20 हजार 509 ग्राहकांकडे 01 कोटी 57 लाख रुपयांची थकबाकी आहे.
 

तर सांगली जिल्ह्यातील सांगली शहर विभागात 33 हजार 543 ग्राहकांकडे 06 कोटी 37 लाख, सांगली ग्रामीण विभागात 30 हजार 165 ग्राहकांकडे 03 कोटी 51 लाख, ईश्वरपूर विभागात 33 हजार 913 ग्राहकांकडे 07 कोटी 06 लाख, कवठेमहांकाळ विभागात 23 हजार 423 ग्राहकांकडे 02 कोटी 91 लाख व विटा विभागात 30 हजार 691 ग्राहकांकडे 05 कोटी 04 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. 


कोल्हापूर परिमंडलात 50 कोटी 49 लाखांची वीजबिल थकबाकी
Total Views: 14