बातम्या
कोल्हापूर परिमंडलात 68 कोटी 34 लाखांची वीजबिल थकबाकी
By nisha patil - 11/26/2025 5:33:41 PM
Share This News:
कोल्हापूर परिमंडलात 68 कोटी 34 लाखांची वीजबिल थकबाकी
10 हजार 354 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित
ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरण
कोल्हापूर/सांगली, दि. 26 नोव्हेंबर 2025: विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 4 लाख 10 हजार 378 ग्राहकांकडे 68 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकवणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील 10 हजार 354 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 5 हजार 835 तर सांगली जिल्ह्यातील 4 हजार 519 ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती 3 लाख 60 हजार 36 ग्राहकांकडे 35 कोटी 67 लाख, व्यावसायिक 32 हजार 653 ग्राहकांकडे 9 कोटी 63 लाख, औद्योगिक 9 हजार 849 ग्राहकांकडे 18 कोटी 48 लाख, सार्वजनिक सेवा वर्गवारीतील 6 हजार 100 ग्राहकांकडे 3 कोटी 79 लाख आणि इतर वर्गवारीतील 1 हजार 740 ग्राहकांकडे 76 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर विभागात एकूण 30 हजार 245 ग्राहकांकडे 5 कोटी 35 लाख, कोल्हापूर ग्रामीण-1 विभागात 38 हजार 897 ग्राहकांकडे 3 कोटी 59 लाख, कोल्हापूर ग्रामीण-2 विभागात 45 हजार 572 ग्राहकांकडे 6 कोटी 93 लाख, जयसिंगपूर विभागात 26 हजार 129 ग्राहकांकडे 3 कोटी 82 लाख, इचलकरंजी विभागात 28 हजार 229 ग्राहकांकडे 11 कोटी 5 लाख व गडहिंग्लज विभागात 21 हजार 329 ग्राहकांकडे 2 कोटी 4 लाख रुपयांची थकबाकी आहे.
तर सांगली जिल्ह्यातील सांगली शहर विभागात 46 हजार 166 ग्राहकांकडे 9 कोटी 16 लाख, सांगली ग्रामीण विभागात 40 हजार 845 ग्राहकांकडे 5 कोटी 41 लाख, इस्लामपूर विभागात 45 हजार 296 ग्राहकांकडे 8 कोटी 60 लाख, कवठेमहांकाळ विभागात 42 हजार 480 ग्राहकांकडे 5 कोटी 14 लाख व विटा विभागात 45 हजार 190 ग्राहकांकडे 7 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर 0.25 टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.
कोल्हापूर परिमंडलात 68 कोटी 34 लाखांची वीजबिल थकबाकी
|