बातम्या
महावितरणच्या नोटिसची होळी करून सरकारचा निषेध
By nisha patil - 6/15/2026 4:51:49 PM
Share This News:
**महावितरणच्या नोटिसची होळी करून सरकारचा निषेध*
**गडहिंग्लजला वीज ग्राहक संघर्ष समितीचे आंदोलन*
*आजरा(हसन तकीलदार)*जुने मीटर बदलून ४८ तासाच्या आत स्मार्ट मीटर बसविण्याच्या महवीतरणच्या नोटिसची होळी करून आज गडहिंग्लज विभागीय कार्यालयाच्या दारात होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी 'स्मार्ट मीटरची सक्ती करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वीज ग्राहक संघर्ष समितीचा विजय असो' अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की ५ जानेवारी २०२५ रोजी आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील वीज ग्राहकांनी प्रचंड मोर्चा काढून स्मार्ट विज मीटरला विरोध केला होता. त्यावेळी तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी संमतीशिवाय एकही मीटर बदलले जाणार नाही असे लेखी पत्र दिले होते. पण लोकांना फसवून स्मार्ट मीटर बसवली जात आहेत. त्यामध्ये महावीतरणचाही हात असल्याचे दिसून येते. म्हणूनच आज आम्ही हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केले आहे असे सांगितले.
शिवसेना (उबाठा)जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले की, एका बाजूला मुख्यमंत्री स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नाही असे सांगत आहेत तर दुसरीकडे महावितरणच्या मदतीने स्मार्ट मीटर बसवली जात आहेत. त्यातही नोटीस काढून लोकांत संभ्रम निर्माण केला आहे म्हणूनच हे आंदोलन आम्ही करीत आहोत.
**आजरा, गडहिंग्लज शहरी भागात जवळ जवळ 90%हे मीटर बसवले गेले आहेत. या महिन्यात जवळपास दीड दोन पटीने वीज बिल जास्त आले असल्याचे वीज ग्राहक सांगत आहेत. पहिली दोन तीन बिले व्यवस्थित आली आता मात्र दीड दोन पटीने वीज बिले जास्त आले असल्याचे बोलले जात आहे. तीनशेहे ते चारशेहे बिल येणाऱ्या वीज ग्राहकाचे हजार बाराशेहे रुपये बिल आल्याने सामान्य वीज ग्राहक हतबल झालेले दिसत आहेत. वीज कार्यालयाशी ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर वीज वापरल्याचा डाटा देण्यात येत आहे. आणि उन्हाळ्यात पंखे वापरले असतील असे उत्तर देण्यात येत आहे.मग हे मीटर प्रमाणित आहेत का? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.*
यावेळी बाळेश नाईक, संजय पाटील, प्रकाश रावळ, इनास फर्नांडिस, कॉम्रेड दत्ता कांबळे, मारुती पाटील, बाळू जाधव, अवधूत पाटील, विलास येमाते, मयुरेश देसाई, संभाजी येदूरकर, मदन शिंदे, सुरेश संकपाळ, व्ही डी जाधव
महावितरणच्या नोटिसची होळी करून सरकारचा निषेध
|