बातम्या
72 तासांचा वीज संप; वीज पुरवठ्यावर विपरीत परिणामाची शक्यता
By nisha patil - 9/10/2025 11:24:53 PM
Share This News:
72 तासांचा वीज संप; वीज पुरवठ्यावर विपरीत परिणामाची शक्यता
आजरा (हसन तकीलदार): तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 72 तासांच्या संपाची घोषणा केली आहे. 29 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या आंदोलनानंतर वीज कृती समितीने हा संप पुकारला आहे.
सरकारी वीज कंपन्यांकडून कामगारविरोधी धोरणांची अंमलबजावणी होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. 6 ऑक्टोबर रोजी अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेतील मान्य बाबींचे अचूक प्रतिबिंब गोषवाऱ्यात नसल्याने संपाचा निर्णय घेण्यात आला, असे समितीने स्पष्ट केले आहे.
या संपामुळे वीज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सध्या पावसासह वीजेचा कडकडाट सुरू असल्याने अनेक ठिकाणी वीज लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी येत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
72 तासांचा वीज संप; वीज पुरवठ्यावर विपरीत परिणामाची शक्यता
|