बातम्या
शिरसंगी ता. आजरा येथे हत्तीचा धुमाकूळ
By nisha patil - 2/3/2026 12:44:20 PM
Share This News:
शिरसंगी ता. आजरा येथे हत्तीचा धुमाकूळ
आजरा(हसन तकीलदार ) :- शिरसंगी ता. आजरा येथे हत्तीने धुमाकूळ घातला असून उन्हाळी पिकांसह ऊस, मका यांचे मोठे नुकसान सुरू केले आहे.त्यामुळे तेथील शेतकरी वर्ग अक्षरशः हतबल झाला आहे.एकतर वाढती महागाई, त्यात शेती करणं आवाक्या बाहेरचे झाले आहे. खतांचे दर गगनाला भिडले आहेत. शेतीमालाला भाव नाही, मजुरांची कमतरता आणि मजुरांची मजुरी न परवडणारी त्यातूनही शेतकरी आपली शेती पिकवतो आहे. अशा परिस्थितीत पिकवलेल्या शेतीचे वन्यप्राण्याकडून नुकसान होत आहे.
सिरसंगी गावाजवळ असणारे गावाबुडी या नावाने असणारे विजय बाजीराव देसाई, किशोर देसाई, गणेश देसाई आणि दत्तात्रय गुरव यांच्या शेतामध्ये व गावकामत या शेतामध्ये गेले चार दिवस झाले हत्तीचा वावर आहे.दिवसा जंगलामध्ये आणि रात्री नऊ नंतर शेतामध्ये प्रवेश करून त्या परिसरामधील ऊस, मका, गहू व इतर पिकांचे मोठे नुकसान सुरू केले आहे.वन विभागाने तातडीने यावर उपाययोजना आखाव्यात आणि हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.
**सरकारला वन्य प्राण्यावर उपाय योजना करता येत नसतील तर वनविभागाने आमच्या जमिनी ताब्यात घेऊन आम्हाला वर्षाला खंड (मोबदला )द्यावा अशी पोटतिडकीने व्यथा मांडली ** सद्या सातेवाडी, पोळगाव, खानापूर, कासार कांडगाव येथील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या शेतजमिनी तशाच पडीक ठेवल्या आहेत. खंड नको तर तशाच कसून खा म्हणायची वेळ तिथल्या शेतकऱ्यांना आली आहे असे मत मंगेश पोतनीस यांनी व्यक्त केले.
शिरसंगी ता. आजरा येथे हत्तीचा धुमाकूळ
|