विशेष बातम्या

*शिरसंगी, मलिग्रे परिसरात हत्तीची दहशत कायम

Elephant terror continues in Shirsangi


By Administrator - 9/3/2026 3:16:53 PM
Share This News:



*शिरसंगी, मलिग्रे परिसरात हत्तीची दहशत कायम

गाड्यांचा चक्काचूर : ऊस, केळीसह पिकांचे नुकसान : परिसरात भीतीचे वातावरण
 

आजरा (हसन तकीलदार ):-शिरसंगी  येथील रस्त्याकडेला उभा केलेली बोलेरो पिकअप व कार हत्तीने पलटी करुन नुकसान केले.या अगोदर विजय देसाई, किशोर देसाई, गणेश देसाई, दत्तात्रय गुरव यांच्या लागण व खोडवा ऊस पिकाला पाणी दिल्यानंतर लोळून ऊस पिकाचे नुकसान केले होते. आजरा तालुक्यातील शिरसंगी, वाटंगी, किणे, मलिग्रे परिसरात हत्तीने पिकांच्या नुकसानीबरोबरच चारचाकी गाड्या पलटी करत मोठी दहशत पसरवली आहे.

गेले महिनाभर या परिसरात हत्तीने धुमाकूळ घातला आता हत्तीने शिरसंगी मलिग्रे रस्त्यावरील शिरसंगी गोठणदेव परिसरात रस्त्याकडेला उभा असलेल्या दोन चारचाकी गाड्या पलटी करुन नुकसान केले. याशिवाय गेल्या महिनाभरापासून ऊस पिकाबरोबरच नारळाची झाडे, केळी आदींचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर हत्तीकडून केले जात असल्याने या

परिसरात भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिनाभरापासून हत्ती तालुक्यातील शिरसंगी, एमेकोंड, किणे, वाटंगी, मलिग्रे, किणे परिसरात धुमाकूळ घालत आहे. पिकांच्या नुकसानीबरोबरच शेती अवजारे व घराशेजारी लावलेल्या चारचाकी गाड्यांचेही नुकसान हत्तीकडून मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. शुक्रवारी रात्री हत्तीने घराजवळ लावलेली परशराम दत्तू माटले यांची बोलेरो पिकअप व पुंडलिक मारुती मलगोंडकर यांची कार पलटी करुन मोठे नुकसान केले. याचबरोबर नारळाच्या झाडांचे व केळीचेही मोठे नुकसान केले आहे.
   

वझरे भागात वाघ आणि सिरसंगी भागात हत्ती आणि इतर भागात गवे आणि रानडुकरे. वन्यप्राण्यापुढे शेतकरी तर हतबल झालाच आहे परंतु सरकार आणि वन विभाग यांची उदासीनता डोक्याच्या बाहेरची आहे. सरकार आणि वनविभाग यांनी यावर तातडीने उपाय योजना आखून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची योजना आखावी अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे.

याबाबत बहुजन मुक्ती पार्टीने आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यात आंदोलन केली आहेत. वन्यप्राण्यांच्या विरोधात त्यांची आंदोलने सुरु आहेत. सह्यांची मोहीमसुद्धा त्यांनी राबवली आहे. यासाठी शेतकरी आणि जनतेतून त्यांना पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.डॉ. उल्हास त्रिरत्ने आणि त्यांचे सहकारी याबाबत लढा देत आहेत. सरकारने यावर तातडीने उपाय योजना आखावी अशी त्यांची मागणी आहे.


*शिरसंगी, मलिग्रे परिसरात हत्तीची दहशत कायम
Total Views: 269