बातम्या
कळंबा परिसरात गणरायास भावपूर्ण निरोप
By nisha patil - 3/9/2025 11:27:28 AM
Share This News:
कळंबा परिसरात गणरायास भावपूर्ण निरोप...
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कळंबा परिसरात घरगुती गणरायाचे विसर्जन भक्तीभावाने पार पडले. काही भाविकांनी आपल्या बाप्पास चारचाकी वाहनातून तर अनेकांनी आपल्या हातावर घेत कळंबा तलावाजवळ उभारलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित केल्या.
कळंबा ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली व कर्मचाऱ्यांची चोख व्यवस्था केली होती. तर परिसरातील तरुण मंडळांनी विसर्जनाहून परतणाऱ्या भाविकांना प्रसादाची सोय करून स्वागत केले.
तलाव परिसरातील कठड्यांवर श्रींची आरती करून, प्रसाद वाटत मनोभावे गणरायाला निरोप देण्यात आला. वातावरणात भक्तिभाव, शिस्त आणि भावनिकता दाटून आलेली दिसली.
कळंबा परिसरात गणरायास भावपूर्ण निरोप
|