बातम्या

कळंबा परिसरात गणरायास भावपूर्ण निरोप

Emotional farewell to Ganesha in Kalamba area


By nisha patil - 2/9/2025 11:43:34 PM
Share This News:



कळंबा परिसरात गणरायास भावपूर्ण निरोप

कोल्हापूर  :  गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कळंबा परिसरात घरगुती गणपती बाप्पास भावपूर्ण निरोप देण्यात आला . यावेळी काही भाविकांनी आपल्या बाप्पास चारचाकी वाहनातून तर अनेकांनी आपल्या हाताचा आधार देत कळंबा तलावाजवळ निर्माण केलेल्या काहीली मध्ये घरगुती गणपती बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले .

कळंबा ग्रामपंचायतीने यासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता ठेवून चोख व्यवस्था केली होती . कळंबा परिसरातील तरुण मंडळांनी विसर्जनाहून परतणाऱ्या भाविकांना प्रसादाची व्यवस्था केली होती . तलाव परिसरातील कठड्यांवर श्रींची आरती करून प्रसाद वाटून मनोभावे निरोप देवून भाविक आपल्या घराकडे परतले .


कळंबा परिसरात गणरायास भावपूर्ण निरोप
Total Views: 60