बातम्या

ईस्टर संडेनिमित्त आवळे मैदानात भावस्पर्शी कार्यक्रम; स्वप्निल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती

Emotional program at Awale Maidan on the occasion of Easter Sunday


By nisha patil - 4/27/2025 11:56:31 PM
Share This News:



ईस्टर संडेनिमित्त आवळे मैदानात भावस्पर्शी कार्यक्रम; स्वप्निलदादा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती

इचलकरंजी : ईस्टर संडेच्या निमित्ताने इचलकरंजी येथील आवळे मैदानावर रूबेन आवळे व आवळे परिवाराच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून सर्व ख्रिस्ती बांधवांना ईस्टर संडेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जीवनावर आधारित एक भावस्पर्शी नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेद्वारे येशूंच्या त्याग, प्रेम आणि मानवतेचा संदेश अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला. उपस्थित प्रेक्षकांनी या सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला माजी आमदार राजीव आवळे, अरुण आवळे, इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक बाळकृष्ण पोवळे, बाजी आवळे, ललित नवनाळे, शांताराम लाखे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत व प्रभावीपणे पार पडल्याबद्दल आवळे परिवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


ईस्टर संडेनिमित्त आवळे मैदानात भावस्पर्शी कार्यक्रम; स्वप्निल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती
Total Views: 87