आरोग्य
सिक लीव्ह’चा मेसेज पाठवला आणि १० मिनिटांत कर्मचाऱ्याचा मृत्यू; बॉसची पोस्ट व्हायरल
By nisha patil - 9/17/2025 1:43:23 PM
Share This News:
सोशल मीडियावर सध्या एका पोस्टमधून समोर आलेली धक्कादायक घटना चर्चेत आहे. ४० वर्षीय कर्मचाऱ्याने सकाळी आपल्या बॉसला पाठदुखीमुळे सुट्टीची विनंती करणारा मेसेज पाठवला. परंतु अवघ्या दहा मिनिटांत त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
कर्मचाऱ्याने सकाळी ८:३७ वाजता “सर, मला तीव्र पाठदुखी आहे, त्यामुळे आज ऑफिसला येऊ शकणार नाही” असा मेसेज बॉसला पाठवला. बॉसने “ठीक आहे, आराम कर” असे उत्तर दिले. मात्र ८:४७ वाजता त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
या घटनेमुळे बॉससह सहकाऱ्यांमध्ये मोठा धक्का बसला असून, बॉसनेच ही घटना सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले –
“जीवन खूप अनिश्चित आहे. आपल्याभोवतीच्या लोकांशी नम्रतेने वागा आणि आनंदाने जगा, कारण पुढच्या क्षणी काय घडेल हे कुणालाच माहिती नसते.”
या घटनेवरून अनेकांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केले असून, जीवन किती क्षणभंगुर आहे यावर चर्चा सुरू झाली आहे.
सिक लीव्ह’चा मेसेज पाठवला आणि १० मिनिटांत कर्मचाऱ्याचा मृत्यू; बॉसची पोस्ट व्हायरल
|