बातम्या
जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी सुरळीत केला पन्हाळ्याचा पाणीपुरवठा
By Administrator - 8/7/2026 8:12:06 PM
Share This News:
जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी सुरळीत केला पन्हाळ्याचा पाणीपुरवठा
बोटीतून धाडसी प्रयत्न; पन्हाळ्याची पाण्याची समस्या दूर
नगरपालिका कर्मचारी व वायरमनची जिद्द;
प्रतिनिधी शहाबाज मुजावर पन्हाळ्याला पुन्हा पाणीपन्हाळा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पन्हाळगडाचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रमोद संकपाळ यांच्याशी संपर्क साधताच पथकाने तातडीने उत्रे जॅकवेल येथे धाव घेतली. लाईफ जॅकेट, बोटी आणि आवश्यक साहित्याच्या मदतीने मोटार व वीजपुरवठ्यातील बिघाड दूर करण्यात आला.
त्यानंतर गडावरील पाणीपुरवठा सुरळीत झाला असून ७ व ८ जुलै रोजी संपूर्ण शहरात पिण्याचे पाणी सोडण्यात आले.मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश हांडे, प्रथमेश येरुडकर, प्रीतम केसरकर, रोहन चौगुले, प्रिया तारळेकर, सुहास भोसले, सागर वांद्रे, अजित जाधव, मानसिंग मोळे, विकास सासवडे तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते अमितराज पवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले, जमीर गारदी, संतोष (बाळू) काशीद आणि नगरसेवक सखाराम काशीद उपस्थित होते. या धाडसी कामगिरीबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नगराध्यक्षा जयश्री पवार यांचे पन्हाळा शहरातून कौतुक होत आहे. पन्हाळा प्रतिनिधी शहाबाज मुजावर
जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी सुरळीत केला पन्हाळ्याचा पाणीपुरवठा
|