विशेष बातम्या

“नगररचना विभागातील बेफिकीरीचा पर्दाफाश..“नियम धाब्यावर आय-कार्ड नसलेले कर्मचारी व रिकामी नोंदवही”

Employees without I cards and empty registers


By nisha patil - 11/26/2025 12:33:37 PM
Share This News:



कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागातील ढिसाळ प्रशासनाचा हिंदू जन संघर्ष समितीने आज अचानक भेटीत पर्दाफाश केला.

सकाळी ११ च्या सुमारास भेट दिल्यानंतर एकही अधिकारी ऑफिसमध्ये उपस्थित नसल्याचे समितीच्या टीमच्या निदर्शनास आले.

कर्मचाऱ्यांनी आय-कार्ड न घालणे, हालचाल नोंदवहीत नोंदी नसणे, तसेच उपस्थिती व्यवस्थेतील गंभीर अनियमितता असे प्रकार समोर आले.

दोन दिवसांपूर्वी आयुक्तांनी आय-कार्ड अनिवार्य करण्याचे आदेश दिले असतानाही विभागात नियमांचे उल्लंघन दिसून आले. समिती आज आयुक्तांची भेट घेऊन व्हिडिओ पुरावे सादर करणार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे.

 


“नगररचना विभागातील बेफिकीरीचा पर्दाफाश..“नियम धाब्यावर आय-कार्ड नसलेले कर्मचारी व रिकामी नोंदवही”
Total Views: 16