बातम्या

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी

Employment opportunities


By nisha patil - 9/9/2025 4:50:20 PM
Share This News:



जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी

कोल्हापूर, दि. 9 : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत होम बेस्ड केअरगिव्हर (घरगुती सहाय्यक) या क्षेत्रात युवक-युवतींना काम करण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवार किमान 10 वी पास, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असलेले व वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच काळजीवाहू सेवांमध्ये प्रमाणपत्र, नर्सिंग, जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग अशा शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

इस्राईलमध्ये नियुक्तीसाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया, आरोग्य तपासणी, व्हिजा व पासपोर्टसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. मेडिकल विमा, निवास व जेवणाची सोय उपलब्ध असून पात्र उमेदवारांना प्रतिमहिना 1 लाख 61 हजार 586 रुपये वेतन मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी www.maharashtrainternational.com


जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी
Total Views: 93